------------------------------XXX---------XXX------------------------------
बालपणी हुंदडलेल्या रस्त्यांवरून
पुन्हा एकदा चालतांना
तेंव्हा खेळलेल्या काच्यांचा
पुन्हा आवाज ऐकताना
शिकलेल्या त्या शाळेकडे
पुन्हा जवळून पाहतांना
ती हाक कानी येते...
'कुठे आहेस तू..??'
घरानजिकच्या चौकामधल्या
जुन्या झाडाकडे बाघकातांना
तेंव्हा आम्हाला गोष्टी सांगणारे
ते आजोबा मला दिसतांना
त्यांनाच स्वत:ची ओळख
पुन्हा करून देतांना
ती हाक कानी येते...
'कुठे आहेस तू..??'
आजही वर्तमानाशी
झुंजत जगतांना
आजही भविष्यामधे
दूर कोठे बघतांना
आजही ती क्षितिजे
दूरच दूर दिसतांना
ती हाक कानी येते...
'कुठे आहेस तू..??'
खरच कुठे आहेस तू..??
वेड्यावाकड्या रस्त्यांच्या
ह्या जाळ्यात हरपलास?
की जीवनाच्या या जटील
चक्रव्यूहात अडकलास?
रुष्ठ या नशीबाच्या
आचेखाली करपलास?
की मेहेनत करतांना गाळलेल्या
घामासोबत झीरपलास?
अस्याच कित्येक प्रश्नांचा
उगाच गोंधळ होतांना
सततच्या ह्या गोंधळात
कान बधिर होऊ बघतांना
पुन्हा ती हाक कानी येते...
'कुठे आहेस तू..??'
पुन्हा एकदा चालतांना
तेंव्हा खेळलेल्या काच्यांचा
पुन्हा आवाज ऐकताना
शिकलेल्या त्या शाळेकडे
पुन्हा जवळून पाहतांना
ती हाक कानी येते...
'कुठे आहेस तू..??'
घरानजिकच्या चौकामधल्या
जुन्या झाडाकडे बाघकातांना
तेंव्हा आम्हाला गोष्टी सांगणारे
ते आजोबा मला दिसतांना
त्यांनाच स्वत:ची ओळख
पुन्हा करून देतांना
ती हाक कानी येते...
'कुठे आहेस तू..??'
आजही वर्तमानाशी
झुंजत जगतांना
आजही भविष्यामधे
दूर कोठे बघतांना
आजही ती क्षितिजे
दूरच दूर दिसतांना
ती हाक कानी येते...
'कुठे आहेस तू..??'
खरच कुठे आहेस तू..??
वेड्यावाकड्या रस्त्यांच्या
ह्या जाळ्यात हरपलास?
की जीवनाच्या या जटील
चक्रव्यूहात अडकलास?
रुष्ठ या नशीबाच्या
आचेखाली करपलास?
की मेहेनत करतांना गाळलेल्या
घामासोबत झीरपलास?
अस्याच कित्येक प्रश्नांचा
उगाच गोंधळ होतांना
सततच्या ह्या गोंधळात
कान बधिर होऊ बघतांना
पुन्हा ती हाक कानी येते...
'कुठे आहेस तू..??'