This is a poem composed (10-March, 2010) on the theme of 'Terrorist Bomb Blasts' happening all over the world. It explains how difficult for all of us to set the life and how easy for unknown to destroy it.. And bomb can't distinguish the people based on Religion, Cast, Cult, etc. so it kills everyone around without any discrimination...
------------------------------XXX---------XXX------------------------------
------------------------------XXX---------XXX------------------------------
अनोळखी ती दोनं
उनाडं कारटि
रद्दितले कागदं
घेऊन बसली ओढ्याकाठी
नाव करून एकानं
ओढ्यात सोडली
तरंगून जरावेळ
पाण्यात ती न्हालि
किती नावा बुडाल्या
किती प्रयोग करूनं
तेंव्हा नाव बनवली
दोन कागदं जोडूनं
ही नाव तर आता
कशी डौलात चालली
ओढ्याच्या प्रवाहाला
छान सांगतं मिळाली
अश्या असंख्य नावांचा
जणू ताफाच सजला
भगवा, निळा, हिरवा रंग
त्यांचा शोभुनं दिसला
चमकलि कारटि
गेली अनन्दुन
धावाया लागली
ताफ्याच्या संगतीनं
तेवढ्यात धडाम् कसला
आवाजं तो झाला
नावांच्या ताफ्यावर
कुणी दगडं मारला
भगव्या-हिरव्या काही नौका
गेल्यात बुडूनं
घराकडे काळा धूर
दिसला दुरूनं
कारट्यान्चा खेळ हा
इथेचं मोडला
उनाडं जीव त्यांचा
घराकडे धावला
दोघांचीही घरं
कशी उध्वस्त झाली
उनाडं ती कारटि
कुणी अनाथ ही केली
दोघं एकमेका गळी
पडूनं रडली
नशीबाच्या अंधारात
त्यांच्या रात्र काळोखली
सूर्योदय होता दोघं
ओढ्याकाठी दिसली
"ये सन्त्या अन् सल्म्या"
कुणी हाकं ती मारली
बधीरले कानं, नजरा
ओढ्यातली स्थिरल्या
भगव्या-हिरव्या नौका
कशा लालबुंद झाल्या
हरवले रंग सारे
हरवले जाती
अनोळखी ती दोनं
उनाडं कारटि
अनोळखी ती दोनं
उनाडं कारटि...
------------------------------XXX---------XXX------------------------------
उनाडं कारटि
रद्दितले कागदं
घेऊन बसली ओढ्याकाठी
नाव करून एकानं
ओढ्यात सोडली
तरंगून जरावेळ
पाण्यात ती न्हालि
किती नावा बुडाल्या
किती प्रयोग करूनं
तेंव्हा नाव बनवली
दोन कागदं जोडूनं
ही नाव तर आता
कशी डौलात चालली
ओढ्याच्या प्रवाहाला
छान सांगतं मिळाली
अश्या असंख्य नावांचा
जणू ताफाच सजला
भगवा, निळा, हिरवा रंग
त्यांचा शोभुनं दिसला
चमकलि कारटि
गेली अनन्दुन
धावाया लागली
ताफ्याच्या संगतीनं
तेवढ्यात धडाम् कसला
आवाजं तो झाला
नावांच्या ताफ्यावर
कुणी दगडं मारला
भगव्या-हिरव्या काही नौका
गेल्यात बुडूनं
घराकडे काळा धूर
दिसला दुरूनं
कारट्यान्चा खेळ हा
इथेचं मोडला
उनाडं जीव त्यांचा
घराकडे धावला
दोघांचीही घरं
कशी उध्वस्त झाली
उनाडं ती कारटि
कुणी अनाथ ही केली
दोघं एकमेका गळी
पडूनं रडली
नशीबाच्या अंधारात
त्यांच्या रात्र काळोखली
सूर्योदय होता दोघं
ओढ्याकाठी दिसली
"ये सन्त्या अन् सल्म्या"
कुणी हाकं ती मारली
बधीरले कानं, नजरा
ओढ्यातली स्थिरल्या
भगव्या-हिरव्या नौका
कशा लालबुंद झाल्या
हरवले रंग सारे
हरवले जाती
अनोळखी ती दोनं
उनाडं कारटि
अनोळखी ती दोनं
उनाडं कारटि...
------------------------------XXX---------XXX------------------------------
Back To: CONTENTS