Completely based on imagination and observations..!!
------------------------------XXX---------XXX------------------------------
------------------------------XXX---------XXX------------------------------
कळतात मला तुझ्या अडचणी
नि बहाने ही कळतात मला
हा एवढा का मागे लागलाय?
कळतो हा प्रश्न ही तुला पडलेला
पण बोलतच नाहीस माझ्याशी कधी
तुला उत्तरे तरी कशी सांगू
जर भेटतच नाहीस मला कधी
स्वत:ला शब्दांत तरी कुठवर मांडू
वाटलंच कधी तुला तर
कुणाला तरी आवडून बघ
दिलेल्या वेळेवर भेटण्यासाठी
कामाची आवरा-आवर करून बघ
शेवटी तो भेटनारच नाही कळल्यावर
तुला काय वाटतं ते जाणून बघ
वाटलंच कधी तुला तर
त्याला तू मेसेज करून बघ
त्या मेसेजच्या रिप्लाय साठी
तासन्तास वाट पाहून बघ
नि वाट पाहून जेंव्हा दिवस संपतो
तेंव्हा काय वाटतं ते जाणून बघ
वाटलंच कधी तुला तर
हे सार मला कधी सांगून बघ
मी असा का वागतो
स्वत:लाच कधी विचारून बघ
खुळ्यागत जरी वाटत असलो
मलाही एकदा समजून बघ
वाटलंच कधी तुला तर
मलाही साद देऊन बघ
मी फसवा आहे की खराखुरा
एकदा तर आजमाऊन बघ
एक प्रयोग म्हणून का होईना
एकदा माझी होऊन बघ
वाटलंच कधी तुला तर...
------------------------------XXX---------XXX------------------------------
नि बहाने ही कळतात मला
हा एवढा का मागे लागलाय?
कळतो हा प्रश्न ही तुला पडलेला
पण बोलतच नाहीस माझ्याशी कधी
तुला उत्तरे तरी कशी सांगू
जर भेटतच नाहीस मला कधी
स्वत:ला शब्दांत तरी कुठवर मांडू
वाटलंच कधी तुला तर
कुणाला तरी आवडून बघ
दिलेल्या वेळेवर भेटण्यासाठी
कामाची आवरा-आवर करून बघ
शेवटी तो भेटनारच नाही कळल्यावर
तुला काय वाटतं ते जाणून बघ
वाटलंच कधी तुला तर
त्याला तू मेसेज करून बघ
त्या मेसेजच्या रिप्लाय साठी
तासन्तास वाट पाहून बघ
नि वाट पाहून जेंव्हा दिवस संपतो
तेंव्हा काय वाटतं ते जाणून बघ
वाटलंच कधी तुला तर
हे सार मला कधी सांगून बघ
मी असा का वागतो
स्वत:लाच कधी विचारून बघ
खुळ्यागत जरी वाटत असलो
मलाही एकदा समजून बघ
वाटलंच कधी तुला तर
मलाही साद देऊन बघ
मी फसवा आहे की खराखुरा
एकदा तर आजमाऊन बघ
एक प्रयोग म्हणून का होईना
एकदा माझी होऊन बघ
वाटलंच कधी तुला तर...
------------------------------XXX---------XXX------------------------------
Back To: CONTENTS