------------------------------XXX---------XXX------------------------------
माझ्या मनमंचावर बरेचदा
गत-क्षणांच्या सभा होतात
प्रत्येक वेळी ते मात्र
माझ्या विषयीच बोलत असतात
गत-क्षणांच्या सभा होतात
प्रत्येक वेळी ते मात्र
माझ्या विषयीच बोलत असतात
अश्याच एका क्षणांच्या सभेत
मीही चोरून उपस्थित होतो
स्वतःपुरत माझ्याविषयी बोलणार्या
प्रत्येक क्षणाला ऐकत होतो
मीही चोरून उपस्थित होतो
स्वतःपुरत माझ्याविषयी बोलणार्या
प्रत्येक क्षणाला ऐकत होतो
प्रत्येक क्षण आपआपला 'मी'
निकषाने मांडायचा
तो किती योग्य नि बरोबर
हे सर्वांना सांगायचा
निकषाने मांडायचा
तो किती योग्य नि बरोबर
हे सर्वांना सांगायचा
प्रत्येक क्षण बोलून झाला
की मी स्वतःवरच हसायचो
ह्यांच्याच साठी का जगतोय आपण
अस स्वतःलाच विचारायचो
की मी स्वतःवरच हसायचो
ह्यांच्याच साठी का जगतोय आपण
अस स्वतःलाच विचारायचो
असा त्या क्षणांवर हसणारा 'मी'
मी कधी ओळखलाच नाही
उपस्थित असलेला मी तिथे
त्या क्षणांनाही दिसलाच नाही
मी कधी ओळखलाच नाही
उपस्थित असलेला मी तिथे
त्या क्षणांनाही दिसलाच नाही
जगतोय मी ज्यासाठी तो
क्षण तर तेथे भेटलाच नाही
आजवर जगलेल्या आयुष्याला मग
अर्थ तरी उरला काही
क्षण तर तेथे भेटलाच नाही
आजवर जगलेल्या आयुष्याला मग
अर्थ तरी उरला काही
परी येणार्या प्रत्येक क्षणामधून
तो श्रेष्ठ क्षण घडवायचा आहे
नि मनमंचावरील गत-क्षणांच्या सभेत
एकदा पुन्हा उपस्थित राहायच आहे
तो श्रेष्ठ क्षण घडवायचा आहे
नि मनमंचावरील गत-क्षणांच्या सभेत
एकदा पुन्हा उपस्थित राहायच आहे
------------------------------XXX---------XXX------------------------------
------------------------------XXX---------XXX------------------------------
Back To: CONTENTS
Reading Between the Lines:
It is in the lonely times when all the past memories (moments) come to his mind and starts boasting about themselves explaining why they were important in his life. At the end when every moment is done boasting he thinks, "are these the moments that I am living for?" And realizes that the moment for which he wants to live is yet to happen to him. That is when he decides to make every future moment so special that, by living in which he should feel like he has lived the entire life in real sense...!!
------------------------------XXX---------XXX------------------------------
Back To: CONTENTS
No comments:
Post a Comment