Popular Posts

Thursday, March 29, 2012

तुझ्या अपेक्षा


One of my older compositions (composed on 21st Feb, 2010)

------------------------------XXX---------XXX------------------------------


ऐकत नव्हतं मन माझं
बघितलं कितीही सांगून
सारखं सारखं बघत होतं
तुझीच चित्रं रंगवून

विचार आला तेंव्हा तुझा
म्हणाला माझ्याकडे पाहून
रोज स्वप्नि बघतोस जिला ती
तुझ्यावर भाळेल तरी का म्हणून

निशब्द झालो मी
नि गेले विचार सारे थकून
शोधून न सापडले उत्तर
गेले प्रश्न हे लज्जीत करून

गुंतून स्वतःत स्वपेक्षान्चि
यादी मी बनवत होतो
धुंदीत ह्या अपेक्षान्चा तुझ्या
विचार करायाचच विसरत होतो

जगून बघेन आता तुझ्याही
अपेक्षान्चा विचार करून
जेंव्हा भेटशिल तेंव्हा तुला
माझा अभिमान वाटावा म्हणून

तुला आवडेल ती प्रत्येक गोष्ट
बघेन स्वतःत आणून
हात धरून चालतांना माझा
तुला जगाचा विसर पडावा म्हणून

नि जेंव्हा भेटशिल तेंव्हा तुला
माझा अभिमान वाटावा म्हणून..


------------------------------XXX---------XXX------------------------------

Back To: CONTENTS

No comments:

Post a Comment