Popular Posts

Friday, March 30, 2012

कल्पना भावी संसाराची



Composed on 18th Apr, 2010

------------------------------XXX---------XXX------------------------------

तू भेटायच्या आधीच
तुझ्याशी बोलावस वाटतय
आपल्या भावी संसाराचं तुझं स्वप्नं
ऐकावस वाटतय

काय म्हणतेस..., मीच सुरूवात करू
तू नंतर सांगशील
आतुरलेल्या कानांनी तुझ्या
निमुत सारं ऐकशिल...

" संसार नं खरच कसा
संतुलित असावा

एकमेकात गुंतताना
व्यक्तिस्वातन्त्र्य जपणारा
दोघांच्या इतिहासा जाणून
एकाच भविष्याकडे बघणारा

त्यात कष्टाची आच असावी
कधी निवान्ततेचा गारवा
तापलेल्या भुइवरी जसा
मेघ वर्षावावा

त्यात प्रेमाची साद असावी
नको बढाइचा नगारा
आप्तान्ची असावी शिग त्यास
त्यांच्या मायेचा पुकारा

गुणांची करावी नवलाइ त्याने
आवगुनांचा तिटकारा
आळसाशि लढावी लढाई
यावा उल्हासास उमाळा

धीर धरून वागण्याची
ताकद त्याने द्यावी
नव्या पिढीला जगण्याची 
ही रीत शिकवावी

एकमेकानपेक्षा आपला जीव
ह्या संसारात रमावा
साथ कधी सुटली तरी
संसार ना तुटावा

साथ कधी सुटली तरी
संसार ना तुटावा "

असाच काहीसा असेल बघ
आपला तो संसार

खरं सांगू...

तुझ्याही पेक्षा नकळत मी
आपल्या ह्या संसाराच्या कल्पनेवरच
जास्तं प्रेम करायला लागलोय...!!


------------------------------XXX---------XXX------------------------------

Back To: CONTENTS

No comments:

Post a Comment